तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवच्या अनुषंगाने  मुळ जागा मालक यांनी आपल्या दुकानाचा बाहेर पोटभाडेकरु  अन्यथा   अतिक्रमणीत साहित्य जप्त करण्याचा इषारा नगरपरिषद ने व्यापारी वर्गास नोटीस ध्दारे दिला आहे.   

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव हा दि.14/10/2023 ते दि.30/10/2023 या कालावधीत साजरा होणार असून या कालावधीत आपण आपल्या दुकानाचे अतिक्रमण करून भाविकास व रहदारीस अडचणी निर्माण होत आहेत. तरी आपण आपल्या जागेतचे व्यवसाय करून फुटपाथवर अतिक्रमण करण्यात येवू नये अन्यथा अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यास सदरील अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात येईल व जप्त केलेल्या साहित्याची नोंद न करता साहित्य परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच प्रत्येक व्यवसायिकांनी आपल्या दुकानासमोर ओला कचरा व सुका कचरा याकरिता स्वतंत्र डस्टबिन ठेवण्यात यावा व गोळा केलेला कचरा नगर परिषद घंटागाडीत टाकण्यात यावा असे नाही केल्यास आपणावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उचित कार्यवाही करण्यात येईल.

तसेच मंदिर परिसर व मंदिरांकडे येणाऱ्या रस्त्यावर लाखो रुपये भाडे घेवुन दुकानदार पोटभाडेकरु ठेवतात. यामुळे अरुंद होवुन त्याचा ञास भाविकांना होत असल्याने यंदा प्रथमच मूळ जागा मालक यांनी आपल्या दुकानाच्या बाहेर/नगर परिषदेच्या जागेवर पोटभाडेकरू ठेवण्यात येवू नये. तसेच सोलेले नारळ, प्लॅस्टिक कॅरीबॅग, पाण्याचे ग्लास, द्रोण, तसेच काचेच्या बाटलीत किंवा कॅरीबॅगमध्ये विक्री करण्यात येवू नये तसे आढळल्यास सदरील साहित्य जप्त करूंन उचित कार्यवाही करण्यात येईल प्रथम वेळेस रु.5000/- व दुसऱ्या वेळेस रु.10.000/- आणि तिसऱ्या वेळेस रु.25,000/- दंड आकारण्यात येणार आहे.


 
Top