उमरगा (प्रतिनिधी)-राष्ट्रीय महामार्गावरील जकेकुर चौरस्त्यालगत असलेल्या जकेकुर औद्योगिक वसाहतीत एका हॉटेलमध्ये पोलिसाच्या स्वतंत्र पथकाने बुधवारी (दि.13) रात्री धाडी टाकुन वेशा व्यवसायाचा पर्दापाश केला. या कारवाईत चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन या ठिकाणी चार पिडीत महिला आढळून आल्या आहेत. शिवाय मोबाईल व रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांना जकेकुर चौरस्त्यालगत असलेल्या जकेकुर औद्योगिक वसाहतीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या गुप्त माहितीनुसार त्यांनी बुधवारी पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर यांच्यासह कारवाईसाठी पथक तयार केले. बनावट ग्राहक पाठवुन पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली. यावेळी शिलरत्न गायकवाड रा. गुंजोटी औराद, जयदिप सोनकवडे, राहुल पुरातले, अजय कांबळे तिघे रा. उमरगा यांनी संगणमत करुन स्वत:च्या आर्थीक फायद्यासाठी ग्राहकास त्यांच्या मागणीप्रमाणे समागमासाठी पिडीत महिलेस लॉजवर बोलावुन घेवुन ग्राहकाकडुन घेतलेल्या पैशातुन प्रत्येक ग्राहकामागे पन्नास टक्के स्वत: कमीशन घेवुन व पिडीत महिलांना पन्नास टक्के रक्कम देवुन, त्यांना समागमाकरीता भाग पाडले. 

या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल वाल्मिक कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिलरत्न गायकवाड (वय 22 वर्षे) रा. गुंजोटी औराद, जयदिप सोनकवडे, राहुल पुरातले (वय 24 वर्षे), अजय कांबळे (वय 23 वर्षे) तिघे रा. उमरगा यांनी संगनमत करून स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता रोहन बार ॲन्ड रेस्टॉरंटच्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये ग्राहकास त्यांच्या मागणीप्रमाणे समागमासाठी पिंडीत महिला यांना बोलावुन वेश्या व्यवसायासाठी आपल्या बारच्या वरच्या मजल्यावरील खोल्या उपलब्ध करून देवून स्वतःचे फायदयाकरीता महिलांना वेश्या व्यवसायकरीता प्रवृत्त करून स्वत:ची उपजिवीका भागवीत असताना मिळुन आलेने त्यांचे विरूध्द कलम 3, 4, 5 अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956, सहकलम 370, 370 अ (2) भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड हे करीत आहेत.


 
Top