धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आदेशानुसार  तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी अभियान दि. 13 सप्टेंबर 2023 व 14 सप्टेंबर 2023 या दिवशी घेण्यात आले. युवा मतदार नोंदणी अभियाना अंतर्गत वोटर्स ॲप यावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्याकडून काजी,  वडवले,  नारायणकर हे हजर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ॲपवर नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षण देऊन नोंदणी करून घेतली.

यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह  माने यांनी वोटर कार्ड किती महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे याची माहिती दिली. विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याकरता डॉ. उषा वडणे, प्रा. प्रमोद तांबारे, प्रा. बालाजी चव्हाण, प्रद्युघ्न वाघमोडे, दिगंबर जाधव यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढे होऊन नोंदणी अभियान यास प्रतिसाद दिला. या नोंदणी अभियानांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकी व फार्मसी शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला आहे.


 
Top