धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती संचलित, धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 14) सप्टेंबर हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित व्याख्यानमालेचे चौथे पुष्प युवराज नळे यांनी गुंफले. विद्यार्थ्यांना हैदराबाद मुक्ति संग्राम लढा विषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष उमाजीराव राजेंद्र देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव दिलीपराव गणेश तर जयपाल शेरखाने, ॲड. अजय वाघाळे व श्रीमती अस्मिता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक पी.एस. जाधव व ए.आर. माडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सी.एन.माळी यांनी केले. तर आभार रमण जाधव यांनी मानले. याप्रसंगी दोन्ही शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सकाळच्या सत्रामध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हाणून सौ. भोसले, श्रीमती सोनवणे यांनी काम पहिले. स्पर्धेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांचे सहकार्य लाभले.