धाराशिव (प्रतिनिधी)-गवळी गल्ली येथील श्री बाल हनुमान गणेश मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाने दहीहंडी फोडण्याचा पडत्या पावसात व पाणी मारण्याच्या जल्लोषात लहान थोर मंडळींनी आनंदपूर्ण व जोशपूर्ण नाचून पार पडले. गवळी गल्लीतील दहीहंडी उत्सव शतकानुशतकापासून  चालत आलेली परंपरा मंडळाच्या संघटनेमध्ये सवंगड्यातील मित्रप्रेम, एकजूट ,शक्ती व भक्ती दाखवण्याचे कार्य जय श्री कृष्णाने त्या कालावधीत केले ते कार्य आज या दहीहंडीच्या स्वरूपातून  उत्सवातून दाखवत आहे.

 बाल हनुमान गणेश मंडळाच्या धाराशिवचा महाराजा मानाचा गणपती यांची पूजा आरती करून  गोविंदाने मुले व मुली गोविंदा आला रे आला या गाण्यावर अत्यंत एक ताल, एकसुर धरून नाच करून एकावर एक थर देऊन चढून दहीहंडी फोडण्याचा मान  पराकष्ठेचा प्रयत्न करीत. दहीहंडी यावर्षी चंद्रयान तीनची यशस्वीता, इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांनी अभिनंदन,  संदेश चांद्रयान तीन आकार व लॅअंडर दाखवून दहीहंडी आकर्षक बनवून  फुलांच्या माळा ने सजवून भारतीयांची शान व मान  अवकाशातले यशस्विता याचे संदेश या दहीहंडीतून एकात्मतेचा, एका विचाराचा व एकजुटीचा विजय  आहे. श्रीकृष्णानी अन्यायाची चीड व  सत्याची चाड असणाऱ्या लोकांची शक्ती, संघटना वाढवून समाज व राष्ट्राचे भाग्य उजळले पाहिजे. भक्षक न बनता रक्षक बनले पाहिजे असा संदेश श्रीकृष्णाने या दहीहंडीच्या माध्यमातून केलेला आहे. गोपाळकाला हा प्रसाद सर्व गोपाळ यांना जमवून  प्रत्येकाच्या घरातील शिजलेल्या शिदोऱ्या एकत्र करून वनात ते सर्वांना एका पंक्तीत, समभावाने मिळून मिसळून खायला दिले होते ,श्रीकृष्णाने दही लाह्या याचा काला कधीच बनविला नव्हता. दही लाह्या गोपाळकाला  इतर पदार्थ एकत्र करून तो प्रसाद वाटप करतो. आणि आनंदाने हात जोडून म्हणतो “धन्य लिला आहे रे बापा तुझी“ परंपरा गवळी गल्लीतील गणेश मंडळाले आजही जोपासली आहे. आजचे अवकाशात यश संपादन करणे इस्त्रोसारख्या संस्थेने एकजुटीचा संदेश. भारतामध्ये एकात्मता टिकून ठेवण्याचे कार्य हे अशा उत्सवातूनच व आनंद उत्सवातूनच घडू शकते.

दहीहंडी यशस्वी करण्यामध्ये व दहीहंडीला चांद्रयान तीन लॅअंडर जी 20 ही यशस्वीतेची हंडी बनवण्यासाठी मंडळाच्या सर्व बालकलाकार युवक यांनी परिश्रम घेतले. यामध्ये दुर्गेश दिवटे, विश्वास दळवी, वरून साळुंखे, मनोज अंजीखाने  केदार उपाध्ये, मुझेमिल पठाण, मनोज अंजीखाणे, अतिश मंडळ, अतुल ढोकर ,विशाल देशमाने ,ऋषिकेश ,लल्ला चवंडके, आकाश महामुने, युवराज हुच्चे संजय पाळणे, सापते, विद्या साखरे, काशिनाथ दिवटे, बसवेश्वर पाळणे, कुणाल दिवटे, दत्ता वाडकर अप्पा खरवरे व हलगी वादक कांबळे, श्रीकांत दिवटे, वैभव अंजीखाने, इत्यादी युवकांचा. लहान बालक व बालिकांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता.  पाण्यामध्ये भिजणे, नाचणे व थरावर थर देऊन वजन पेलणे , थर ढासळता कामा नये यासाठी यशस्वी होण्याचा मार्ग क्षमता, शक्ती ,संघटन हे मजबूत असेल तर आपल्या देशातील निधर्मी राष्ट्रीय एकात्मता कुणीही तिचे विभाजन करू शकत नाही असा संदेश या दहीहंडीतून आपल्यापर्यंत येऊन पोहोंचतो. दहीहंडी उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह मनमत आप्पा पाळणे, प्रा. गजानन गवळी, काशिनाथ दिवटे, नंदकुमार हुच्चे महिला व पुरुषांनी  गर्दी केली होती. व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी व या गोविंदाला  प्रेरणा देण्यासाठी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचा नियोजनाचा भाग प्रा भालचंद्र हुच्चे राजकुमार दिवटे इत्यादींनी केले होते.गोपाळकाला प्रसाद वाटप करून समारोप करण्यात आला


 
Top