धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्री आई यांचे प्रतिमेचे यांचे पूजन  आशा  देवेंद्र  कदम यांच्या निवासस्थानी करण्यात आली. जिजाऊ - सावित्री पूजनाचे हे 12 वे वर्ष आहे. 

कदम परिवार दरवर्षी छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या जिजाऊ व स्त्री शिक्षणाची पहिली शाळा चालवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सर्वप्रथम शिक्षणाचा हक्क या देशात मिळवून दिला व ते मिळवण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला ज्यामुळे आज शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात महिला प्रगती करत असताना आपण पाहतो.

याप्रसंगी आशा कदम, शिल्पा कदम, शालन हरभरे, अनिता गुरव, स्नेहल नाईकवाडी, भाग्यश्री अंधारे, राजश्री शिंदे, शैला कटारे, ज्योती  कालढोणे, प्रमिला कालढोणे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 
Top