नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 46 गणेश भक्तांनी रक्तदान केले.

नळदुर्ग येथील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ हे एक शहरांतील नावाजलेले गणेश मंडळ आहे. गणेशोत्सवात या मंडळाकडुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जाते. यावर्षी मंडळाने मंडळाचे कार्यकर्ते कै. ओंकार स्वामी, कै.पंकज ग्रामोपाध्ये व कै.आकाश घोगरे यांच्या स्मरणार्थ दि.24 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराला युवकांचा उत्स्फुर्त प्रतीसाद मिळाला असुन या शिबीरात 46 युवक गणेश भक्तांनी रक्तदान केले.

मल्लिकार्जुन मंदिराच्या सभागृहात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज देवकर यांच्या हस्ते तर माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी नगरसेवक बसवराज धरणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, डॉ. विवेक मुळे, डॉ. मंगरूळे यांच्या प्रमुख उपस्थिती झाले. सोलापुर येथील डॉ. वैश्यपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापुरच्या रक्तपेढीने रक्त संकलन केले. रक्तपेढी प्रमुख डॉ. सरोज बोलदे, पथकप्रमुख डॉ. नमिता नायगावकर, डॉ. गोपाळ कारंडे, डॉ. सागर पाटील, अधिपरीचारक चंद्रकांत कट्टीमनी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संजना रोहीटे, अमित कदम, कौस्तुभ खैरवकर, यांनी रक्त संकलन केले.

आज सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असुन रुग्णांना जीवदान देण्यासाठी सर्वच रुग्णालयात रक्ताची नितांत गरज आहे. ही गरज ओळखुन धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाने आपल्या मंडळाचे दिवंगत कार्यकर्त्यांस्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करून खऱ्या अर्थाने आपल्या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहिली आहे. मंडळाचे हे कार्य कौतुकास्पद व समाजपयोगी आहे.

हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मंडळाचे महालिंग स्वामी, संतोष वाले, पिंटू जाधव, रमेश जाधव, उमेश जाधव, गणेश मोर्डे, सुनिल गव्हाणे, अजित भुमकर, श्रीशैल्य स्वामी, संजय जाधव, केदार स्वामी, रोहित वाले, प्रदीप ग्रामोपाध्ये यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार तानाजी जाधव यांनी केले.


 
Top