उमरगा (प्रतिनिधी)- बदलते वातावरण,जागतिक लोकसंख्या वाढ, नवनवीन आजारांचे थैमान या धर्तीवर भारत सरकारच्या वतीने सुरु केले असलेल्या स्वच्छता या सेवा उपक्रमला मोठे अनन्यसाधारण महत्व आहे. जगभरात आरोग्य व स्वछता याचे सम गुणोत्तर बघायला मिळते. जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य नांदते, म्हणूच स्वच्छ हो भारत ही कामना कृतीतून प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी करू या असे मत आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. दत्ता भुजबळ यांनी व्यक्त केले.

शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, कोरेगाववाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शाखेचे उदघाटन करण्यात आले यावेळी प्रा. भुजबळ बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडदुर्गे, संस्था सचिव डॉ. विजय बेडदुर्गे उपस्थिती होती. प्रारंभी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करत उदघाटन करण्यात आले. 

यावेळी प्राचार्य महेश कदारे, प्रा अजय बेडदुर्गे, प्रकल्प अधिकारी प्रा किरण पांचाळ, प्रा श्याम घंटे, प्रा वैष्णवी, प्रा प्रिया धोंडगे, प्रा सुनंदा सोळंकर, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प स्वयंसेवक अमोल बिराजदार, महेश थोरे, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य महेश कदारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा अंकिता वडजे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. धनश्री भुजंगे यांनी आभार मानले.


 
Top