उमरगा (प्रतिनिधी)- मराठवाडा सेवक प्रतिष्ठान द्वारा 74 वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय मराठवाडारत्न पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ संपादन, साहित्यिक डॉ. सागर देशपांडे यांच्या हस्ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव महेश देशमुख यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड पुणे येथे एका समारंभात मराठवाडा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महेश देशमुख यांनी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात आपली ओळख निर्माण करुन अल्पावधीतच उदयोजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्यांचे पेठसांगवी या साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या गावी पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे लक्षात घेऊन स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने युवा उद्योजक महेश देशमुख यांनी स्वतःचे शेतातून टँकरने गावासाठी संपूर्ण उन्हाळा मोफत पाणीपुरवठा केला होता. तर नारंगवाडी येथे त्यांनी भव्य असा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. अनेकांचे लग्नकार्य, वैद्यकीय अडचणीच्या वेळी मदतीला जाणारे दातृत्व त्यांच्याकडे आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन मराठवाडा सेवक प्रतिष्ठानद्वारा 74 वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड पुणे येथे एका समारंभात विविध क्षेत्रातली व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्यस्तरीय मराठवाडारत्न पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ संपादक, साहित्यिक डॉ. सागर देशपांडे यांच्या हस्ते महेश देशमुख यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यातील योगदानाबद्दल मराठवाडा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक, साहित्यिक श्रीपाल सबनीस होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, अ.भा. म. चित्रपट संघटनेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुरेश कोते, भाऊसाहेब जाधव, सानिया पाटणकर, योगीराज गोसावी, सतीश भाऊ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.