उमरगा (प्रतिनिधी)-स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल मॅथ्यामॅटिक्स ऑलंपियाड स्पर्धेत पंचवीस विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केल्याने मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.

श्री राष्टृीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदीर येथे इ.स.2022-23 मध्ये सायन्स ऑलंपियाड फौंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथ्यामॅटिक्स औलंपियाड स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेतील 25 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे.त्याबद्दल त्यांचा श्री राष्टृीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत महाजन,सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव वडणे,कार्यवाह डॉ.कपिल महाजन यांच्या हस्ते गोल्ड मेडल,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये 21 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल,3 विद्यार्थ्यांना मेडल ऑफ डिस्टीक्शन,तर एका विद्यार्थ्याला झोनल गोल्ड मेडल मिळाले आहे.या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला तर गणित विषय शिकविणारे सह शिक्षक अविनाश जोशी तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केल्याने स्वामी विवेकानंद शाळेस प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

  याप्रसंगी संस्थेचे संचालक राजा देशट्टी, मुख्याध्यापिका श्रीमती सवीता लोहार,मुख्याध्यापक नेताजी गायखवाड,परिक्षा प्रमुख प्रणित सुर्यवंशी आदीसह विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती अनुराधा तुळजापूरे यांनी तर अभार रामदास कुलकर्णी यांनी मानले.


 
Top