धाराशिव (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथआबा कोळगे सोसायटीच्या वतीने हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने लढा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा या विषयावर खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेत प्रथम बक्षीस 1001, द्वितीय बक्षीस 701 तर तृतीय  बक्षीस 501 अशा बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असून याच्यासाठी पाच मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे.

सदरील  स्पर्धा दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता रुईभर ता. धाराशिव येथील जयप्रकाश विद्यालयामध्ये होणार आहेत  तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन हैदराबाद मुक्ती संग्राम लढलेल्या योध्यानां त्यांच्या कार्याला उजाळा द्यावा  असे आवाहन स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथआबा कोळगे सोसायटीचे अध्यक्ष रामदास कोळगे यांनी केले आहे.


 
Top