धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी यांना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार बळाचा गैरवापर झाल्या प्रकरणी दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करणे व मराठा आंदोलकांवर झालेले गुन्हे माघारी घेणेबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर करून येथील आंदोलक लहान बालके, महिला, वृद्ध व्यक्ती, तरुण यांच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. यात आंदोलक गंभीरित्या जखमी झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय मागणी आहे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामुळे आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव व राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी खालील पठाण प्रदेश सचिव अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य, अतुल जगताप जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, मच्छिंद्र क्षीरसागर माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष, सतीश घोडेराव सेवादल सेल जिल्हाध्यक्ष,प्रशांत फंड तालुकाध्यक्ष उस्मानाबाद, असद खान पठाण जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, डि.के कांबळे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, राजकुमार पवार शहर उपाध्यक्ष, बालाजी शिंदे उपसरपंच केशेगाव,प्रतीक चंद्रकांत माने तालुकाध्यक्ष विद्यार्थी, सागर गाढवे तालुका सचिव विद्यार्थी, राजाभाऊ जानराव सहसचिव सामाजिक न्याय विभाग, भाई फुलचंद गायकवाड, सुरेश राठोड आंबेजोगाई जि.प. गट प्रमुख तसेच आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.