धाराशिव (प्रतिनिधी) - केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा माहिती समाजातील सर्व घटकापर्यंत पोहविण्यासाठी मल्टिमिडीया प्रदर्शन उपयुक्त असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी आज येथे केले. सोलापूर येथील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, यांच्या वतीने राष्ट्रीय पोषण महिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाचे 9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.

 जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे, माविमचा जिल्हा समन्वक अधिकारी शोभा कुलकर्णी, माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समनवयक डॉ. रवी भोपळे आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले भरड धान्य आणि केंद्र शासनाच्या 9 वर्षातील विकासकामांची माहितीचे अत्यंत सुंदर व वाचनीय मांडणी प्रदर्शनात केली आहे. या प्रदर्शनात  योजनांबाबत दिलेल्या माहितीचा लाभ सर्वांनी घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

चव्हाण म्हणाले प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने मागील 9 वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहिती सह भारतीय भरडधान्याचा इतिहास, ऐतिहासिक नावे, विविध दुर्मिळ प्रजाती आणि आरोग्यासाठी होणारे फायदे या विषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंबादास यादव यांनी केले. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 6 वाजेर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

राष्ट्रीय पोषण महिना निमित नागरी प्रकल्प आणि ग्रामीण बाल विकास प्रकलपाच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडून भरड धान्यापासून बनविण्यात आलेल्या आहार प्रात्यक्षिकाचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ व पौष्टीक आहार बनविलेल्या सेविकांना पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात आले. पौष्टिक भरडधान्ये, राष्ट्रीय पोषण महिना आणि केंद्र शासनाने माघील 9 वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूरचे कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, महिती सहायक नंदू पवार,अनिकेत सक्सेना, योगानंद कोंडाबतीन, सूरज जाधव, साईराज राऊळ आदींनी परिश्रम घेतले.


 
Top