धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील सुलतानपुरा भागातील रत्यांची आणि नाल्यांची झालेली दुर्दशा,  भुमिगत गटारीच्या कामासाठी संपूर्ण रस्ता उखडून टाकण्यात आल्याने  चिखल होऊन या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात नागरी सोई-सुविधा पुरविण्याची मागणी त्रस्त रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे  केली आहे.

सुलतानपुरा भागातील नागरिकांच्या वतीने बुधवार 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी  यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुलतानपुरा विभागातील रहिवाशी असून सदर परिसरात मागील कित्येक वर्षांपासून रस्ते, नाली व स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळे येथील रहिवाश्यांना परिसरात येण्या जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच मोटार सायकल व इतर वाहनांना देखील सदर परिसरातून जाण्यास अडचणी होत आहेत.

या व्यातिरिक्त सदर परिसरात नाली नसल्यामुळे घरातील सांडपाणी व पावसाचे पाणी हे रस्त्यावर साचुन परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून मोकाट जनावरे फिरत आहेत. तसेच सद्यस्थिती पावसाळ्याचे दिवस असून तेथे संपूर्ण रस्ता चिखलमय होत असून लोक घसरून पडत आहेत. याचा अधिकचा त्रास हा वृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांना होतो आहे.

त्यामुळे या भागाची स्वच्छता करून नगरी सुविधा देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अलीम पठाण, रिजवान पठाण, नुमान शेख, शहेनवाज शेख, शाबद शेख, मुस्ताक शेख, सारिका कुलदीप सावंत, उज्वला नागेश सावंत, राजेश निवृत्ती कोळी, वैशाली उमेश कोळी, रूपाली राजेश कोळी, सचिन थोरात, राणी थोरात, फिरोज अन्सारी, अशरफ तांबोळी, अरबाज तांबोळी, सदिया तांबोळी, परवीन तांबोळी, सदिय तांबोळी, अशिफ शेख, जनार्दन सावंत, नागेश सावंत आदींची स्वाक्षरी आहे.


 
Top