धाराशिव (प्रतिनिधी) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 17 सप्टेंबर 2023 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.

  सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  यावेळी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'मेरी मिट्टी मेरा देश '  हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. यावेळी अमृत कलश यामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या हातून माती टाकून हे अभियान उत्स्फूर्तपणे राबवण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा माधव उगिले यांनी मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर राज्यशास्त्र  विभागातील प्रा. डॉ. डी. वाय. साखरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले,प्रस्ताविक डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले, तर आभार प्रा., माधव उगिले यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top