धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित के.टी पाटील संगणकशास्त्र महाविद्यालयात व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत 75 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

यावेळी 75 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विषयी आपले विचार व्यक्त करताना डॉ. अजित मसलेकर सर म्हणाले की“ मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी 1948 मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.

स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 मध्ये महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली , हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले परंतू निजाम ऐकण्यास तयार नव्हता. “वंदे मातरम्‌‍‍ चळवळीद्वारे अनेक विद्यार्थीनी मराठवाडा निजाम मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. “ शेवटी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली. या लष्करी कारवाईत निजामाचा संपूर्ण पराभव झाला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आपला मराठवाडा स्वातंत्र्य झाला अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा पराग कुलकर्णी, प्रा.शुभम पाटील, प्रा. बग्गा सर, प्रा.पालके सर, प्रा गरड, प्रा. कांबळे मॅडम, प्रा. सौ. कदम, प्रा. सौ.गवळी मॅडम, सुदर्शन कुलकर्णी, अजय शिराळ, राजाभाऊ जाधव, श्रसय्यद, मुंढे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top