तुळजापूर (प्रतिनिधी)- अभिषक पास पुजा दर वाढ कमी करा, टोळ भैरोबा दरवाजा उघडणे व नगर परिषद शाळांसाठी 6 कोटी निधी देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली. 

निवेदनात म्हटलं आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त बैठकीमध्ये अभिषेक पास दरवाढ केली होती ती रद्द करुन पुर्ववत ठेवावेत, टोळभैरव दरवाजा खुला ठेवावा, नगर परिषद शाळा क्र 1,2 व 3 च्या विकासा करिता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत 6 कोटी निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच टोळ भैरोबा दरवाजा हा सुरक्षेच्या कारणास्तव बरेच वर्षा पासुन बंद आहे तो दरवाजा स्थानिक पुजारी, भाविकांसाठी उघडण्यात यावा.  नगर परिषद अंतर्गत  तीन शाळा असुन काही शाळा  मानांकन प्राप्त आहेत. सदरील शाळेच्या इमारती या पडीक, अपुरी जागा अशा अवस्थे मध्ये आहेत. 

सदरील शाळेच्या विकास कामासाठी तुळजा भवानी मंदिर संस्थान मार्फत नव्याने शाळेच्या विकास कामासाठी 6 कोटी निधी मंदीर संस्थान मार्फत देण्यात यावा. जेणे करुण शहरातील नगर परिषद शाळांचाही विकास होईल व शहर वासियांच्या दृष्टीकोणातुन एक चांगल्या प्रकारच्या शाळेची उभारणी होईल.

सदरील मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.


 
Top