परंडा (प्रतिनिधी)- पंकजाताई मुंडे यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच कार्यकत्यांनी फटाके फोडून फुलांचा वर्षाव करत पंकजाताई यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच जनता पक्षाचे वतीने माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

  यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्याना भेटी द्या असा हजारो कार्यकर्त्याचा आग्रह होता त्या आग्रहाखातर शिवशक्ती परिक्रमा दौऱ्याचे राज्यात आयोजन करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे प्रतिपादन परंडा येथे पकंजाताई मुंडे यांनी व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वागता नंतर पंकजाताई मुंडे यांनी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या ‌‘संवाद' निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.  

यावेळी संताजी चालुक्य,नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, विकास कुलकर्णी, सुबोधसिह ठाकूर, ॲड.जहिर चौधरी, हनुमंत पाटील, ॲड भालचंद्र अवसरे, सुरेश कवडे, हनुमंत पाटील, अदम शेख, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, ॲड.संदीप शेळके, राजेद्र चौधरी, उमाकांत गोरे, चंद्रकांत काकडे, निशिकांत क्षिरसागर, तानाजी पाटील, विठ्ठल तिपाले, दादा गुडे, अजित पाटील, अशोक भांडवलकर, सुजित परदेशी, सुखदेव इंगळे यांच्यासह आदी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.


 
Top