नळदुर्ग (प्रतिनिधी)- दि.11 सप्टेंबर रोजी पवित्र श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार असल्याने यादिवशी श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी नळदुर्ग शहरातील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर,ईस्टलिंगेश्वर महादेव मंदिर, श्रीक्षेत्र रामतीर्थ येथील महादेव मंदिर या सर्व महादेव मंदिरात भाविकांनी पहाटेपासुनच मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना केळीचे वाटप करण्यात आले.

नळदुर्ग शहरात व्यासनगर येथे राष्ट्रीय महामार्गालगत श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर, हुतात्मा स्मारकासोर टेकडीवर श्री ईस्टलिंगेश्वर महादेव मंदिर, तसेच श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे महादेव मंदिर आहेत. दि.11 सप्टेंबर रोजी पवित्र श्रावण महिन्यातील शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त या सर्व महादेव मंदिरात भाविकांनी श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासुनच मोठी गर्दी केली होती. यावेळी श्री महादेवाला महाभिषेक करण्यात आले.

श्री उत्तरेश्वर महादेव मंदिरात मंदिराचे प्रमुख अमर भाळे व शंकर भाळे यांच्यासह भाळे कुटुंब तसेच भाविकांच्या वतीने भाविकांना केळीचे वाटप करण्यात आले. ईस्टलिंगेश्वर महादेव मंदिरातही भाविकांनी श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिराचे प्रमुख अमोल कांबळे व लखन कांबळे यांनी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्याबरोबरच मंदिर फुलाने सजविले आहे. त्याचबरोबर याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला केळीचे वाटप करण्यात आले. श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त महंत श्री विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद येथील महाराजांकडुन संगीतमय सुंदरकांड पठण करण्यात आले. सुंदरकांड हा अध्याय श्री हनुमान स्तुतीपर अध्याय असल्यामुळे याचे श्रवण केल्यास जीवनातील सर्व दुःख व कष्ट दुर होते. सकाळी 10.30 वा. या सुंदरकांडचे पठण करण्यात आले. शहरांतील सर्वच महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसुन येत होती.


 
Top