धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात पेरणीनंतर सलग 35 दिवसापासुन पाऊस न पडल्याने, सोयाबीन व इतर पिकाची वाढ झालेली नाही. शेतकऱ्यांनी पिक विमा उतरला आहे. जिल्हाधिकारी यानी शेतकऱ्यांना 25% विमा नुकसान भरपाई द्यावी असा आदेश काढला असला तरी मदत कधी मिळणार हे न उलगडणारे कोडेच आहे.
सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून जे सोयाबीन शेतात उभे आहे त्यावर एल्लोमोजाक रोग आल्यामुळे थोडीफार पिकाची आशा होती ती ही संपली आहे. 100% नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनानेच या कडे लक्ष देवुन त्वरित विमा नुकसान भरपाई देण्यात कंपन्यांना आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाउपाध्यक्श लक्ष्मण सरडे यानी केली आहे.