धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील भुई गल्ली गणेश मंडळ संभाजी चौक येथे गेल्या 55 वर्षापासून उभ्या गणपती बसविण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद (नाना) धतुरे हे असून, गेल्या 55 वर्षापासून धतुरे परिवाराच्यावतीने महाआरती करण्याचा पहिला मान धतुरे परिवाला मिळत असतो. 

या मंडळाने गेल्या 55 वर्षात रक्तदान, शैक्षणिक, सार्वजनिक, पर्यावरण आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. विशेष म्हणजे हे गणेश मंडळ मुस्लिम बहुसंख्य वस्ती असलेल्या गल्ली असताना देखील सर्व मुस्लिम बांधव गणेश मंडळाच्या विविध उपक्रमात सहभागी होतात. या गणेश मंडळाने गेल्या 55 वर्षात 7 फुटासपासून ते 12 फुटापर्यंत उभा गणपती बसविले आहेत. या मंडळास नगर परिषद, पोलिस विभाग यांच्यासह अनेक संस्थांनी पुरस्कार देवून गौरव केला आहे. 


 
Top