धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा अथलेटिक्स संघटनेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षांनिमित्त जिल्हास्तर ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव येथे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये आपल्या एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ यमगरवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव येतील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. 300 मी धावणे या क्रीडा प्रकारात प्रवीण जाधव याने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक व 2000 मी स्टीपल चेस या क्रीडा प्रकारात ओंकार भोसले याने द्वितीय क्रमांक मिळवला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात स्थान निश्चित केले.
या दोन खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर,बालाजी क्षीरसागर, यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू, कार्यवाह, विवेक आयचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.