परंडा (प्रतिनिधी) - मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील शिराळा येथील मराठा समाजाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली इथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवारचा उपोषणाचा 15वा दिवस असून त्यांच्या समर्थनार्थ शिराळा येथील सकल मराठा समाज,ग्रामस्थांच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण हनुमान मंदिरासमोर करण्यात आले. जोपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश शासन जारी करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही. खरे,सच्चे आणि कडवट मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी शिराळा गावातील सकल मराठा समाजाच्या महिला, ज्येष्ठ ग्रामस्थ, तरुण अशा सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय शेकडोच्या उपस्थितीमध्ये लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी उपोषणास बसलेल्या समाज बांधवानी शासनाला विनंती केली की सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे ते लवकरात लवकर देण्याचा अध्यादेश जारी करावा. त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अश्या तीव्र भावना व्यक्त केल्या. लवकरात लवकर अध्यादेश जारी केला नाही आणि मराठा समाजाला जर न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आमदार, खासदारांवर नामुष्कीची वेळ येईल आणि जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा तीव्र भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये समाजाचे अत्यल्प प्रमाण पाहता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षण मिळावे हाच मराठा समाजाच्या भवितव्याच्या हिताने न्याय आहे. सरकारने याची दखल घ्यावी आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे.अशी मागणी शिराळा येथील सकल मराठा समाज बांधवांनी यावेळी केली.तसेच माहितीस्तव येथील तहसिलदार यांना आरक्षण संदर्भात मागणीचे निवेदन देण्यात आले.