धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथे श्री सिध्दीविनायक परिवारातील श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा रोलर पूजन समारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

कार्यक्रमासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुशील चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच काटगावचे सरपंच अशोक माळी, नांदुरीचे सरपंच हनुमंत पाटील, मोहन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून रोलरचे पूजन करण्यात आले.

यावेळी बालाजी कोरे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, दिनेश कुलकर्णी, अरविंद गोरे तसेच सिध्दीविनायक परिवारातील अधिकारी, कारखान्यातील वाहतूक ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top