धाराशिव (प्रतिनिधी)- इतक्या मोठ्या संख्येत महिला असलेली  ट्रिप सुरू झाली आणि प्रत्येक महिलेने मनमुराद या ट्रिपचा आनंद लुटला. इतकया संख्येने महिला ट्रीपला पहिल्यांदाच निघाल्या होत्या. त्यामुळे त्या स्वतः सुद्धा साशंक होत्या. श्रावणमासा निमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्यावतीने भीमाशंकर दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती. 

सदरील दर्शन यात्रा दि.05/09/2023 रोजी तुळजापूर येथून पहाटे निघाली होती उत्तर रात्रीपर्यंत या महिलांनी या सहलीचा आनंद लुटला. श्रावण महिन्यानिमित्त यावेळी तुळजापूर तालुक्यातील भाविक महिलांना बारा जोतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र श्री भीमाशंकर देवस्थान ता.अंबेगाव.जि. पुणे येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक बस या प्रमाणे 9 बसेसची सोय करण्यात आली आहे.

या सहली निमित्त महिलांची हितगुज करताना मा. सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की देवदर्शन एक निमित्त आहे, देवदर्शन आपण आपल्या गावात सुद्धा करू शकतो. पण महिलांना कधीही घराच्या बाहेर पडून स्वतःसाठी आनंद घेता येत नाही. त्यामुळे मी दरवर्षी अशा सहलीचे नियोजन करते. आणि त्यानंतर महिलांमधून ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतात, त्या जो आनंद घेतात, त्यामुळे माझा स्वतःचा आनंद द्विगुणीत होऊन पुन्हा पुन्हा अशा सहलीचे नियोजन करावे असे माझ्या मनामध्ये सतत येत राहते. यंदाच्या  या ट्रीपला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्ही स्वतः सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिला घेतल्यामुळे सांशक होतो की महिला कसा प्रतिसाद देतील, परंतु महिलांनी इतका सुंदर या सहलीचा आनंद लुटला कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता निर्विघ्नपणे महिलांना सुखरूप घरी सोडल्याचे माझ्या मनामध्ये समाधान आहे.

या सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनीही अर्चनाताई च्या माध्यमातून आपल्याला सहलीचा पहिल्यांदाच आनंद घेता आला व आपण सहल कशी असते हे पाहिल्याचे जाणीवपूर्वक नमूद केले. यावेळी भीमाशंकर प्रशासनाच्या वतीने मा.सौ. अर्चनाताई पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


 
Top