धाराशिव (प्रतिनिधी)-भूम, परंडा व वाशी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्त पंचनामे करून तिन्ही तालुक्यातील सर्व महसूल मंडळ 25% अग्रिम मिळवण्यास पात्रता यादीमध्ये घेवून खरीप 2023 चा पीक विमा व अनुदान तसेच सततच्या पावसाने नुकसान झालेल्या 2022 मधील सोयाबीनचे अनुदान मिळण्यासाठी शेतकरी व शेतकरी पुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

भूम, परंडा व वाशी तालुक्यातील सर्व महसूल मंडळ 25% अग्रिम मिळवण्यास पात्रता यादीमध्ये समावेश करावा. खरीप 2023 मध्ये नुकसान झालेल्या पिकांचा हक्काचा पिक विमा संबंधित विभागाकडून मंजूर करून त्वरित शेतकऱ्यांना विमा वाटप करावा.  भूम ,परंडा व वाशी तालुक्यातील पावसा अभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई म्हणून अनुदान मंजूर करावे. भूम, परंडा व वाशी तालुक्यात 2022 मधील सततच्या पावसाचे मंजूर झालेले अनुदान अजूनही वाटप करण्यात आलेले नाही. ते त्वरित वाटप करण्यात यावे. तसेच त्यांच्या त्रुटी असलेल्या याद्या,  करूनही अनुदान वाटप न झालेल्या याद्या,  न केलेल्या याद्या, अनुदान प्रलंबित पडलेल्या शेतक-यांच्या याद्या व उर्वरित शेतक-यांच्या याद्या प्रत्येक गावातील व्हॉट्सॲप ग्रुप वर दोन दिवसात प्रसिद्ध करण्यात याव्यात.

वरील मागण्यासाठी आम्ही दि.31/08/2023 रोजी भूम येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होत त्यानंतर हि उपरोक्त मागण्या संदर्भात गांभीर्य जाणवत नाही. त्यामुळे दि.06/09/2023 रोजी जिल्हाधिकरी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले आहे. असे निवेदन म्हटले आहे.निवेदनावर भूम, परंडा व वाशी तालुक्यात शेतकरी व शेतकरी पुत्रांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top