तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील तुळजापूर खुर्द भागात अज्ञात चोरट्यांने युवकावर हल्ला करुन जखमी करुन त्याचा गळ्यातील सोन्याची चैन हिसकावुन घेवुन पळुन गेल्याची घटना रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरट्यांनी याच भागातील कुलुपबंद घरांना लक्ष केल्याचे वृत्त आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, तुळजापूर खुर्द येथील तुळशीराम अप्पा ताटे हे आपले भाऊजी यांना तुळजापूर येथुन चारचाकी गाडीने तुळजापूर खुर्द येथे आले असता त्यांना तीन युवक संशियत अवस्थेत फिरत असल्याचे दिसताच त्यांनी गुपचुप गाडी लावत अनलाँक करीत असताना गाडीच्या वाहनाचा आवाज आल्याने चोरट्यांनी गाडीकडे धाव घेतली. तुळशीराम यांच्या गळ्यातील सोन्याची चैन त्यांना दिसताच त्यांनी राँडचा धाक दाखवत सोन्याची चैन हिसकवुन घेताना ती तुळशीराम यांच्या बनियन मध्ये खाली घसरली नंतर ती चैन घेण्यासाठी चोरट्याने चाकुने हल्ला करताच हात आडवा धरल्याने त्यांच्या अंगठ्यावर वार झाल्याने ते जखम झाली. यावेळी उर्वरीत दोघांनी गाडीवर विटा, दगड फेकत होते. अखेर चेन घेवुन चोरटे जाताच आरडाओरडा करताच परिसरातील लोक जमले व जखमी तुळशीराम यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे गाड्या चोऱ्या व किरकोळ चो-यांचे प्रमाण वाढल्यामुळे चोऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. या बाबतीत पोनि गजानन घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, घटनास्थळी आम्ही तात्काळ पोहचलो असुन सीसीटीव्ही तपासणी केली असता दोन तरुण एक थोडासा वयस्कर संशियत चोर दिसुन येतात. माञ त्यांचे चेहरे व्यवस्थित दिसुन येत नाही. आम्ही आमची तपास यंञणा कामाला लावली आहे. सदरील भाग शहराच्या बाह्य भागा लगत आहे. तरीही नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन केले.
