तुळजापूर (प्रतिनिधी)- मानवाने शरीरातील काम क्रोध रुपी विकार काढुन टाकले पहिजेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध किर्तनकार हभप डॉ. जितेंद्र डोलारे केले .संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजीत किर्तनात ते बोलत होते प्रारंभी संतसेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
किर्तनकार हभप डॉ. डोलारे आपल्या किर्तनात पुढे म्हणाले, संतसेना महाराजाचे जीवनकार्य अलौकिक आहे त्यांचे विचार आचरणात आणने काळाची गरज आहे. मानवाचा शरीरातील काम, क्रोध या दुर्गुणामुळे मनुष्य देवत्वाला मुकला आहे. भोगाचा त्याग करणे म्हणजे त्याग नव्हे तर कामनेचा त्याग करणे खरा त्याग आहे. या किर्तनात त्यांनी संतसेना महाराजांच्या जीवनकार्याची माहीती काल्याच्या किर्तनातुन सांगितली. यावेळी नाभिक समाजातील दहावी, बारावी यशवंत अर्थव अभिमान, गोरे प्रज्ञा, ज्ञानेश्वर घोडके, वैभवी प्रमोद कावरे, युवराज धर्मेंद्र कावरे, यश नंदकुमार डाके, प्राजक्ता विष्णू दळवी, श्रावणी विजय शिंदे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,
त्यानंतर सेवानिवृत्त बद्दल शहाजी कावरे मुख्याध्यापक, जयराज सुर्यवंशी, वैशाली शिंदे, प्रमोद अरविंद चौधरी यांना समाजभूषण पुरस्काराने किर्तनकार हभप डाँ. जितेंद्र डोलारे, माजी गटशिक्षण अधिकारी अरविंद चौधरी, तलाठी सुरेंद्र माने, तात्या घोडके, आनंद कंदले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, पंडीत जगदाळे, अमर हंगरगेकर,अमोल कुतवळ, विजय कंदले, विशाल रोचकरी, निलेश रोचकरी सह समाज बांधव मोठ्या संख्येन ेउपस्थितीत होते.