तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील सांगवी मार्डी येथील श्री शिवशक्ती 1908 महाशिवलिंग मंदिरातील शंभूमहादेवास  श्रावण मासात दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी 1108 शिवशक्ती महादेव   मंदिरातील महादेव पिंडीवर जल अभिषेक सोमवार दिनांक 11 रोजी  करण्यात आला. 

सोमवार  सकाळी 8.30 वा जलयाञेस सांगवी मार्डी, पाण्याच्या टाकीपासुन आरंभ झाला. ही 1108 शिवशक्ती महादेव मंदिर जलयाञा काढण्यात आली. यात महिलांनी कलशात जल घेवुन डोक्यावरून ते जल महादेव मंदिरात आणण्यात आले. हे जल  महिला भक्तांनी शंभु महादेव पिंडीवर ओतुन जलअभिषेक करण्यात येवुन भरपूर पाऊस पडुन दुष्काळ सावट दूर कर असे साकडे घालण्यात आले. 

यावेळी युवराज बागल (सरपंच, सांगवी), गजानन वडणे (उपसरपंच, माकुंब्रा), रामेश्वर वैद्य (सरपंच, मसला खुर्द), तानाजी बेले (सरपंच, सारोळा), बाबासाहेब गुंड (उपसरपंच, सुरतगांव), सुजित कापसे (सरपंच, सिंदफळ), श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जनराव साळुंके, उत्तमराव वाघ, जयवंत पाटील, उदगिर  कुमार करजगी, भागवत कुंभार, गणेश बागल, नेताजी पवार, राजु भोसले, अनिल वडणे, वैशालीताई पाटील, सोनाजी पवार, दत्तात्रय व्यवहारे  अदि उपस्थितीत होते. यावेळी जय हनुमान भजनी मंडळ (सांगवी), महिला भजनी मंडळ (माळुंब्रा )

गुंडेश्वर महिला भजनी मंडळ (सावरगांव) आदींनी भजन सेवा केली, नंतर- महाप्रसाद दाते रमेश पाटील यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.


 
Top