तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे विमुक्त भटके जाती यांच्या करिता आयोजित करण्यात आलेल्या शिबीरामध्ये विविध अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये नवीन आधार कार्ड काढणे 6, आधार कार्ड दुरुस्ती  7, मतदार नोंदणी फॉर्म नंबर सहा 3, रेशन कार्ड दुय्यम प्रत 6, नवीन 2, नाव समविष्ठ 15, अनु जमाती विमुक्त जमाती  दाखलेसाठी 63 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.यावेळी तेरचे तलाठी पी.सी.देशमूख, हिंगळजवाडीचे तलाठी आर.आर.बेशकराव, बी.एल.ओ., पुरवठा विभागाचे कर्मचारी, रेशन दुकानदार उपस्थित होते.


 
Top