तुळजापूर (प्रतिनिधी)-सार्वजनिक आरोग्य विभागाने 15 ऑगस्ट पासून मोफत उपचार  देण्याचा निर्णय घेतल्याने येथील उपजिल्हारूग्णालयात रुग्णांची संख्या दुप्पट वाढल्याने येथील आरोग्य यंञणेवर मोठा ताण पडत आहे.                                

येथील उपजिल्हा रूग्णालयत या निर्णया अगोदर ओपीडी 200 ते 250 होती आता दुप्पट होवुन पाचशेवर गेल्याने उपजिल्हा रूग्णालय  रुग्णांनी दररोज हाऊस फुल्ल दिसत असुन उपचार औषधा साठी लांबच्या लांब रांगा लागत आहेत. रुग्ण संख्या दुप्पट वाढली माञ कर्मचारी तेवढेच असल्याने आहे त्या डाँक्टर कर्मचारी वर्गावर कामाचा ताण वाढला आहे. मोफत उपचार योजना जाहीर करुन अमलांत आणली पण त्यासाठी लागणारे मनुष्यबळ औषधसाठी उपलब्ध करुन न दिल्याने याचा ञास रुग्ण व डाँक्टर कर्मचारी वर्गास बसत आहे  मोफत उपचार बरोबरच सध्या अचानक पावासाळा असताना कडक ऊन पडत असल्याने बाल ताप खोकला रुग्ण वाढले आहेत.                      

मोफत उपचार असल्याने किरकोळ आजार असला तरीही लोक दवाखान्यात येत असल्याने अशा नवश्या गवश्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयात दाखल झाल्यास अनेकदा रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी दिली जाते. त्यामुळे पैसे आणि वेळ या दोन्हींचा अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून मोफत उपचार करण्यात येणार असून त्याबरोबरच रुग्णांना वा त्यांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णांना काही तक्रारी असल्यास 104 या टोल फ्री क्रमांकावर त्याची नोंद करता येणार आहे.


 
Top