धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हात पाऊस लांबल्यामुळे शेतकरी बांधवावर दुष्काळाचे संकट असताना पाण्याअभावी पिके सुकत आहेत. त्यातच महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी दुहेरी आस्मानी संकटात सापडला आहे. त्यांच्या विरोधात आज धाराशिव येथे मुख्य महावितरण कार्यालयाच्या समोर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
तसेच भारनियमन आणि विजेच्या लपंडावामुळे शेतीचा विजपुरवठा दोन-दोन दिवस खंडीत होत आहे. त्यामुळे एकेरी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. दुसऱ्या पावसाचे अत्याल्प प्रमानामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवलदिवल झाला आहे. अतिरिक्त केले जाणारे भार नियमण बंद करण्यात यावे व नियमीतपणे 8 तास योग्य दाबाने सुरळीतपणे विजपुरवठा करण्यात यावा, उच्चदाब प्रणाली योजने अंतर्गत मंजुर असलेले वैयक्तीक विद्युत संच जोडणीची () प्रलबिंत कामे तात्काळ पुर्ण करावीत आदी मागण्यांसह विद्युत ठेकेदारांची बीले काम न करता दिलेत याचीही चौकशी करावी. यासह अनेक मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी व अधिक्षक अभीयंता महावितरण यांना देण्यात आले.
विजवितरण कंपनीचया अधि काऱ्याने वरील सर्व मागण्यांचा 15दिवसात सोडवणे व यावर योग्य मार्ग काढून असे आश्वासन जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या समक्षते दिल्यानंतर सदरील धरणे अंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आ. कैलास पाटील, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर. जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, उपजिल्हाप्रमुख प्रदिप बमेटे, विभागीय सचीव अक्षय ढोबळे, सतीश सोमाणी, जगन्नाथ गवळी, अमोल बिराजदार, विकास मोळवणे, बाबुराव शहापुरे, विश्वजीत नरसिंग जाधव, शाम जाधव, सोमनाथ गुरव, रणधीर सुर्यवंशी, संग्राम देशमुख, संजय देशमुख, सुधाकर पाटील, नितीन शेरखाने, दत्ता बंडगर, रवि वाघमारे, बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, मुजीफ काझी, आबेद सय्यद, कलीम कुरेशी, धनंजय इंगळे, अमोल मुळे आफरोज पिरजादे,निलेश शिंदे, राणा बनसोडे यासह पदधिकारी उपस्थित होते.