धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून गुरुवर्य के.टी.पाटील सरांच्या जयंतीनिमित्त श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 16 महाविद्यालयातील 38 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

प्रथम सरस्वतीदेवी व गुरुवर्य के.टी.पाटील सरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजच्या युवकाची दशा आणि दिशा, पर्यावरण ऱ्हास संरक्षण व उपायोजना, आजचा शेतकरी आणि कृषी कायदे, गुरुवर्य के.टी.पाटील सरांचे शैक्षणिक कार्य या चार विषयावर सदरील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव देशमुख सर, उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी सर, के.टी.पाटील फाउंडेशन बॅचचे प्रमुख प्रा.विनोद आंबेवाडीकर, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. नंदकुमार नन्नवरे, विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक प्रा. तानाजी हाजगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.सूर्यकांत कापसे, हिंदी विभाग प्रमुख प्रा. आप्पासाहेब गुत्ते, संस्कृत विभाग प्रमुख प्रा. पांडुरंग गर्जे, मराठी विभाग प्रमुख प्रा.मनोज डोलारे यांनी काम पाहिले.

कु. सानिया शेख ही या वक्तृत्व स्पर्धेची विजेती ठरली. तर कु.प्रिया पन्हाळे व कु.स्नेहल चौरे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर यश संपादन केले. तसेच सुशेन जगदाळे, दिनेश जोशी, कु.भार्गवी वाघ, कु.संज्योती पालखे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. वक्तृत्व स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र, गुरुवर्य के.टी.पाटील सरांचे चरित्र पुस्तक, स्मरणिका, पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी कौतुक केले. ही वक्तृत्व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सूर्यकांत कापसे, प्रा मनोज डोलारे, प्रा. विवेक कापसे, प्रा.शितलकुमार ऐवळे, प्रा.प्रसाद माशाळकर, आण्णा डावकरे आदींनी परिश्रम घेतले.


 
Top