धाराशिव (प्रतिनिधी)-कळंब तालुक्यातील येरमाळा, इटकूर या गावामध्ये असलेल्या महावितरण वीज कंपनीच्या शाखा धाराशिव कार्यालयाशी जोडलेल्या आहेत. परंतू नव्याने अस्तीत्वात आलेल्या परंडा विभागीय कार्यालयाशी येरमाळा, इटकूर जोडण्याचा निर्णय महावितरण कंपनीने इटकूर येरमाळा गावातील लोकप्रतिनिधी, जनता यांना विचारात न घेता त्यांच्याशी चर्चा न करता परस्पर घेतला आहे. त्यामुळे येरमाळा, इटकूर वीज कंपनीच्या शाखा परंडा शाखेला जोडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगाकवर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गुरुवारी (दि.28) दिला आहे.
या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, येरमाळा इटकूर येथून परंडा विभागीय कार्यालय जवळपास 80 ते 85 कि.मी. तर धाराशिव कार्यालय 55 ते 60 कि.मी. अंतरावर आहे. सदरील गावातील जनतेला परंडा विभागीय कार्यालयापेक्षा धाराशिव कार्यालय जवळचे व सोईचे असल्यामुळे महावितरण कंपनीने घेतलेला निर्णय रद्द करावा व पूर्वीप्रमाणे धाराशिव विभागीय कार्यालय कायम ठेवण्यात यावे. तसेच महावितरण कंपनीने 15 डिसेंबर 2020 रोजी कळंब तालुक्यातील शिराढोण येथील सुरज प्रकाश मुंदडा गट क्रं.264 व प्रकाश नारायणदास मुंदडा गट क्रं.259 यांचेकडून प्रत्येकी 11 हजार रुलये भरुन HVDS IN AGHVDS या योजनेमध्ये पैसे भरुन तीन वर्षाचा कालावधी झालेला आहे. परंतू त्यांना मागणीप्रमाणे डी.पी.बसविण्यात आलेला नाही. सदर काम अर्धवट ठेवण्यात आलेले आहे. याविषयी वारंवार संबंधीत महावितरणाचे अधिकारी व कर्मचायांना विचारणा केली असता आम्हाला माहिती नाही, गुत्तेदाराकडे काम आहे, त्यांना बोला अशी उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. मुंदडा यांच्यासह जिल्ह्यातील हजारो शेतकयांची कामे अर्धवट अवस्थेत असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत व वीज वितरण कंपनीतील सावळा गोंधळ थांबविण्या संदर्भात संबंधीतास आदेशीत करावे, अन्यथा वीज महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुधगांवकर यांनी निवेदनात दिला आहे.