धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला,नळदुर्ग येथील उपक्रमशील शिक्षिका तसनीम सुलताना मोईनोद्दीन सय्यद यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या  उत्कृष्ट अध्यापन,शाळेतील सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग ,इयत्ता 10 वी उर्दू चा 100% निकाल या सर्व गुण कौशल्यांचा विचार करून 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा पुरस्कार 24 सप्टेंबर 2023 रोजी लातुर येथे शिक्षक आमदार मा.श्री.विक्रम काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेतर्फे ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल  देऊन गौरविण्यात आले.हा पुरस्कार मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातील एकूण 38 शिक्षकांना प्रदान करण्यात आला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


 
Top