नळदुर्ग (प्रतिनिधी)- आयुष्यमान मोहिमेअंतर्गत आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरीकांनी घ्यावा असे आवाहन नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रद्धा कदम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रमात बोलतांना केले.

आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत दि.13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा कदम,माजी नगरसेवक विनायक अहंकारी, पत्रकार विलास येडगे,नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. आनंद काटकर हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले.

आयुष्यमान मोहिमेचा शुभारंभ लाभार्थ्यांना आभा कार्डचे वाटप करून करण्यात आले.यावेळी बोलतांना वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा कदम यांनी म्हटले की,आयुष्यमान भाव मोहिमेअंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात आभा कार्ड काढणे, आयुष्यमान कार्ड काढणे,18 वर्षांवारील तरुणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, “निरीगी आरोग्य, तरुणीचे वैभव“या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे.गावपातळीवर देखील आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत आयुष्यमान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा नागरीकांनी लाभ घ्यावा असेही यावेळी डॉ. श्रद्धा कदम यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमास आरोग्य सहाय्यक साळुंके,आरोग्य सहाय्यीका श्रीमती किरडे,आरोग्य सहाय्यक तीर्थकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top