तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना (शिंदे गटाच्या) शहरप्रमुखपदी बापुसाहेब भोसले व युवासेना शहरप्रमुख पदी अभिजीत अमृतराव यांची नियुक्ती करण्यात आली, तुळजापूर शासकीय विश्रामगृहात नुतन पदाधिका-यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या आदेशान्वये खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे,शिवसेना सचिव संजयजी मोरे यांच्या सुचनेवरून जिल्ह्याचे पालकमंत्री मा.प्रा.डॉ.तानाजीराव सावंतसाहेब,
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,शिवसेना धाराशिव जिल्हाअध्यक्ष मोहन पनुरे सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम तालुकाप्रमुख संभाजी पलंगे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पञ देण्यात आले.
यावेळी तुळजापूर शहरप्रमुखपदी बापुसाहेब भोसले,,युवासेना शहरप्रमुखपदी अभिजीत अमृतराव निवड करुन नियुक्ती पञ देण्यात आले. शिवसेना शिंदेगट शहरप्रमुखपदी बापुसाहेब भोसले व युवासेना शहरप्रमुख पदी अभिजीत अमृतराव यांचे शहरातील युवा वर्गात काम करणारा माणुस म्हणून ओळख असल्याने शिवसेनाशिंदेगट पक्ष वाढीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. या निवडीचे शहरवासियांन स्वागत होत आहे.