उमरगा (प्रतिनिधी)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची सदस्य नोंदणीची मोहीम हाती घ्यावी. सर्वांना सक्रिय करून आगामी नगर पालिका,पंचायत समित्या व जिल्हा परिषदेत आपले प्रतिनिधी निवडणूक देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे मत रिपाइंचे संयुक्त सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गटांच्या) कार्यकर्त्यांची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (दि.16) रोजी घेण्यात आली.या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी रिपाइंचे राज्य कार्यकारणी सदस्य एस.के.कांबळे(चेले) मराठवाडा प्रदेश सेक्रेटरी हरिष डावरे,धाराशिव जिल्हा सेक्रेटरी तानाजी कदम आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ओहाळ म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका हा क्रियाशील सदस्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो भारतीय दलित पँथर पासून कार्यकर्त्यांची मोठी फळी असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून आपली पार्टी केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांचा रेटा वाढला पाहिजे गाव निहाय्य शाखा काढून बुत कमिटी सक्षम करीत आपले पदाधिकारी आगामी निवडणुकीत कसे निवडून येतील या साठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले उमरगा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रभारी तालुका अध्यक्ष पदी दगडू भोसले व महिला आघाडी अध्यक्ष पदी आशाताई कांबळे यांची निवड करीत असल्याचे त्यानीं जाहीर केले येणाऱ्या 15 दिवसात गाव वाईज शाखा स्थापन करून कार्यकर्त्यांची सदस्य पक्ष नोंदणी मोठ्या प्रमाणात करावी असे आव्हान राजाभाऊ ओहाळ यांनी केले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकारणीत बाबा गायकवाड,वैजिनाथ सुर्यवंशी,अंगद कांबळे,श्रावण गायकवड,राजा सूर्यवंशी, महावीर भालेराव,धर्मा सुरवसे,बाळू कांबळे,आनंद कांबळे,विजय कांबळे,आदींची निवड करण्यात आली.
बैठकीसाठी रिपाइंचे शहराध्यक्ष दीपक झाकडे, महिला आघाडी अध्यक्ष आशाताई कांबळे,दत्ताभाऊ गायकवाड, सनातन सुरवसे,उमाजी गायकवाड, शहाजी मस्के,माधव गायकवाड,मधुकर गायकवाड, दत्ता भाले, हरी सुरवसे, सुनील वाघमारे,आदीं कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिष डावरे यांनी केले.