तुळजापूर (प्रतिनिधी)- विघ्नहर्ता श्री गणरायाचा आगमनाची तयारी जोरात सुरू असून, बाप्पाच्या मुर्ती बाजार पेठेत विक्रीस दाखल झाल्या आहेत. तसेच सजावटीच्या
साहित्याने बाजारपेठ बहरुन गेली आहे. पोलिस स्टेशन अंतर्गत 35 गावे तुळजापूर शहर असे 36गावे असुन आजपर्यत 37 सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली नोंदणी केली आहे. बाजारपेठेत आरास सजावटीला लागणाऱ्या चमकी, माळा, सजावटीचे साहित्य, मखर फेटे विभूषणे पोशाख मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. 19 सप्टेबरला घरोघर विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आगमन होणार आहे.
बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस दिवस उरल्याने बाप्पाच्या आगमनाचे वेध लहानांपासून मोठ्यांना लागले आहेत. थर्माकोलला बंदी असल्याने गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक मखरांनामागणीवाढल्यामुळे कलाकारांनीही पर्यावरण व सण यांची सांगड घालत कापड, कागद, पुठ्ठे, प्लायवूड यापासून बनवलेले मखर बाजारात आणले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मोठे मंडप स्वागत कमानी उभारल्या गेल्या असुन विद्युत रोषणाई काम सुरु झाले आहे.