धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी 2 तरुणांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले त्यामुळे अनर्थ टळला.
हैद्राबाद मुक्ती संग्रामचा ध्वजारोहण कार्यक्रम सुरु असताना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला गेल्याने धावपळ व खळबळ उडाली. तुळजापूर ते मुंबई या मराठा वनवास यात्रेचे आयोजक सुनील नागणे व प्रताप पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर आंदोलन केले व मराठा आरक्षणाची मागणी केली. मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधुन आरक्षण देण्याची मागणी केली, सर्व सरकारने फसविले असल्याचा आरोप यावेळी केला.