तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजाचे आंदोलन शांत होते न होते तोच आता धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आक्रमक होत असुन सोमवार दि. 18 रोजी सकाळी 11 वा. आरंभ होवुन धनगर आरक्षण विराट हक्क मोर्चा छञपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून काढण्यात येवुन यांची सांगता जुन्या बसस्थानक चौकात  होणार आहे.

धनगरी ढोल वाद्यांच्या गजरात मेंढरांसह धनगर समाज बांधव यात सहभागी  होणार आहेत. धनगर समाजाचे हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी धनगर समाज बांधवांची तुळजापूर तालुक्यात गावोगाव धोंगडी बैठक होत असुन काटगाव, गोंधळवाडी सह अनेक गावात या आंदोलन साठी घेण्यात आलेल्या धोंगडी बैठकी मोठा प्रतिसाद खास करुन युवा वर्गाचा लाभ आहे. 

धनगर समाजास एसटीत आरक्षण देवुन अमंलबजावणी करा तसेच तिर्थक्षेञ तुळजापुर आणि  नळदुर्ग शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे  या प्रमुख मागण्या आहेत. तरी या  आंदोलनास समस्त  धनगर समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल धनगर समाज व धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीने केले आहे. 
Top