धाराशिव (प्रतिनिधी)- रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 24सप्टेंबर 2023 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला.

  सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. माधव उगिले यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस व या विभागामार्फत वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमा याविषयी मार्गदर्शन केले.

   यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी प्रा. नगरे बी. के, प्रा. स्वाती बैनवाड प्रा. राठोड एम. एच व महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top