धाराशिव (प्रतिनिधी)-गवळी गल्लीतील स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले धाराशिवचा महाराजा व मानाच्या गणपती यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मुदत निधी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठविणे विषयी रकमेचा डीडी सुपूर्त करण्यात आले. याचवेळी मंडळाच्या वतीने विविध मागणी व समस्या याविषयी एक निवेदन देण्यात आले.
नुकतेच रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इरशाळवाडी गावावर दरड कोसळून व अतिवृष्टी पावसामुळे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि कुटुंब व अनेक माणसं यामध्ये मृत्युमुखी पडली गाव उध्वस्त झाले. या दुर्घटनेत नैसर्गिक आपत्ती असली तरी, आमच्या गणेश मंडळाने अनेक वर्षापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये निधी पाठवून छोटेसे सहकार्य करण्याची भावना कायमची आजही तागायत जोपासलेली आहे. इर्षाळवाडी या गावाच्या व कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी मंडळाने आज रोजी मदत निधी यांच्याकडे सुपूर्त करतेवेळी मंडळाचे कार्यवाह मनमत पाळणे ,उपाध्यक्ष प्रा.गजानन गवळी, काशिनाथ दिवटे ,अमोल दिवटे विश्वास दळवी राजकुमार दिवटे दुर्गेश इत्यादी समवेत निधीचा डीडी देण्यात आला यापूर्वी मंडळाने 1979 मध्ये पूरग्रस्तांसाठी ,1983 मध्ये कोकणग्रस्तना मदत निधी विदर्भ पूरग्रस्तांसाठी मदत निधी 1991, भूकंपग्रस्तांसाठी मदत उस्मानाबाद लातूर मध्ये 1993 , 2001 मध्ये गुजरात भूकंपग्रस्तांसाठी मदत निधी, 2005 मध्ये अतिवृष्टी निर्माण झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील व कोकणातील या वेेळी मदत मुख्यमंत्री निधीमध्ये देण्यात आलेला आहे. 2017 मध्ये सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिनी कल्याण निधी मंडळांनी दिलेली आहे .या पद्धतीने मंडळ महाराष्ट्रात आलेल्या आपत्ती व संकटास शासन सामोरे जात असताना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्हाधिकारी ओंबासे म्हणाले की मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी दिला आहे असे चित्र काही दिसले नाही हे पहिले मंडळ आपले आहे की इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी आपण मदत निधी देत आहात. याबद्दल मंडळास धन्यवाद दिले .अत्यंत योग्य रीतीने गणेश मंडळाने कार्य करून आगळावेगळा पायंडा मंडळाने पाडले आहे .
याचवेळी मंडळांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना विविध क्षेत्रातील समस्या व मागण्यांबाबत कायदेशीर कार्यवाही व अंमलबजावणी करणे बाबत निवेदन देण्यात आले. गर्भजल परीक्षण व स्त्री भ्रूण हत्या रोखणे, महिलांच्या वरील अन्याय अत्याचार जुलूम थांबवणे, शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवावी ,2023 शेतीच्या हंगामात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ,आरक्षणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मोफत मिळावे ,राज्यातील सरळ सेवा भरती एक नोंदणी पद्धत, सरळ सेवा परीक्षार्थींना एसटी प्रवास मोफत द्यावा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ,शिधावाटप केंद्रातून भरड धान्य मिळावे ,.युद्ध कला शिवकालीन खेळांचा मर्दानी खेळ म्हणून शालेय क्रीडा स्पर्धेत व शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमात, प्रात्यक्षिकात समावेश करावा,ज शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्र व प्रशिक्षक मार्गदर्शक क्रीडा कार्यालयातून उपलब्ध व्हावे. जालना येथे मराठा समाजावर झालेला लाठीमार करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी. हैदराबाद मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतून दैनंदिन परिपाठाच्या वेळी दररोज एक पान वाचन व्हावे. ज्यामुळे हैदराबाद मुक्ती संग्राम यांची ओळख होऊ शकेल. 83 वर्षांपूर्वी तेर येथील पुरातत्व खात्यातील घेऊन नेलेल्या ,पुरातन वस्तू तेर येथे परत मिळाव्यात. यासाठी मंडळाने आपल्या निवेदनामध्ये उल्लेख करून
जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केले.