परंडा (प्रतिनिधी) -आयुष्मान भव फेज 1 या शासन आपल्या दारी अंतर्गत जनसामान्यांना दीर्घ, सुखी, संपन्न, सक्षम आयुष्य मिळणे हेतू सुरू केलेला जीवनदायी आरोग्यदायी उपक्रम आहे. याची सुरुवात आज शनिवार दि.23 रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे सुरू करण्यात आली आहे . 

महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे आभार व्यक्त करताना व आयुष्यमान भव फेज वन याबद्दल माहिती देताना  डॉ. अब्रार पठाण, डॉ. आनंद मोरे, डॉ. गणराज चौगुले, डॉ. अभिजीत खरटमल, असंसर्गिक आजार विभागाचे प्रमुख तानाजी गुंजाळ, अमोल वांबुरकर, रवी करपे, फार्मासिस्ट  ओव्हाळ, बापू खताळ, सतिश भराटे, नागेश रणखांब, दाजी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

 यावेळी उपस्थित सर्व लाभार्थी रुग्ण समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यापुढे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परंडा, डॉ. विश्वेश कुलकर्णी  यांच्या आदेशाने मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये आभा कार्ड याची उपयुक्तता असंसर्गिक आजार याची कारणे व उपाय यासह रक्तदान व अवयव दान हे एक सामाजिक कर्तव्य याची सर्वांगीण माहिती उपस्थितांना देण्यात आली.


 
Top