धाराशिव (प्रतिनिधी)   महाराष्ट्र शासनाच्या बाल संगोपन योजनेतंर्गत  जिल्ह्यामधील अनाथ, निराश्रीत, दुर्धर आजारी पालकांची, कैद्यांची, पालकांचा पत्ता लागत नसलेली ,एकल पालक,  परित्याग, मातृत्व गंभीर, पालक रुग्णालयात असणे, ताणतणाव, न्यायालयीन वाद , कौटुंबिक संकटात असलेली, कुष्ठरुग्ण, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदयाची,एच आय व्ही ग्रस्त, 40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली अंध ,दिव्यांग , मागणारी पोक्सो अंतर्गत बळी पडलेली तीव्र कुपोषित बालके, आजार व्यसनाधीन कोविड मधील एक पालक नसलेली नैसर्गिक आपत्तीमध्ये पालक, बालविवाहाला बळी पडू शकणारी व विधी संघर्षातील आशा प्रकारच्या बालकांसाठी दर महिना शासन 2250/ रुपये बालकांच्या खात्यावर टाकणार आहे.

तरी  धाराशिव जिल्ह्यातील या योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे. सदरील योजनेत लाभ मिळवण्यासाठी व अधिक सविस्तर माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा पत्ता- शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे पतसंस्था, पोलिस लाईन समोर ग्रीन लॅन्ड स्कुल रोड धाराशिव फोन -02472 -222220 मो- 9422466995  तसेच  70 20 85 57 30 या  व्हाट्सअप नंबरवर  तातडीने आशा बालकांची नावे दि 03 सप्टेंबर 2023 पर्यंत पाठवावीत असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे.


 
Top