धाराशिव (प्रतिनिधी)- देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त शिवून स्वातंत्र्य मिळाले होते.परंतु हैद्राबाद, काश्मिर व जुनागढ या संस्थांनातील जनता गुलामीतच होती.मराठवाडा निजामाच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन छेडले गेले.या संग्रामात उस्मानाबाद जिल्ह्याचेही महत्वपूर्ण योगदान आहे. असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा.डॉ. सतीश कदम यांनी केले.
नुकतीच जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यासाठी पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत इतिहास संशोधक प्रा.डॉ सतीश कदम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.यावेळी प्रा. डॉ. कदम बोलत होते.
या बैठकीला उपस्थित जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामाबाबतची माहिती या व्याख्यानातून जाणून घेतली.
आपल्या व्याख्यानात बोलताना डॉ.कदम पुढे म्हणाले, मराठवाडा निजामाच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन छेडले गेले. हा लढा 13 महिने सुरु होता. या लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.निजाम शरण येण्यास तयार नव्हता.त्यावेळी भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरु केली. आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त झाला.या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.पण संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमतीने संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली.मात्र हैदराबाद,काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता.भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.7 सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैद्राबाद संस्थानवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला.त्यानुसार 13 सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले. या दरम्यान 17 सप्टेंबरला निजामाने माघार घेतल्याचे डॉ.कदम यांनी यावेळी सांगितले.
त्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील विर योद्धांच्या गाथा, येथील सामन्य नागरिकांचे जीवन, उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टर हैदर अली यांचे शासन व ऑपरेशन पोलो याबाबत सविस्तर भाष्य केले.
यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी संतोष भोर,अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,उपविभागीय अधिकारी संजय पाटील,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांध्यासह अन्य विभागाने प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थीती होती.