धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संग्राम आहे.भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले परंतू मराठवाडा निजामांच्या पारतंत्र्यातच होता.निजामाच्या/ रझाकारांच्या आत्याचाराविरुद्ध मराठवाड्याने जो लढा दिला तोच मराठवाडा मुक्तीसंग्राम.वीरांनी रक्त सांडवून मराठवाडा स्वतंत्र केला आपण रक्तदान करून जीवनदान देऊया असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांनी केले.    

लढयाची सुरूवात तसेच मुख्यत्वाने जो लढा दिला गेला तो या आपल्या जिल्ह्यामध्ये लढ्यात हजारो लाखो नागरीकांनी बलिदान देऊन मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र केला असल्याचे सांगून डॉ.डोमकुंडवार म्हणाल्या,17 सप्टेंबर 2023 रोजी या लढयास 75 वर्ष पूर्ण होत आहेत.म्हणून राज्य शासनातर्फे संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.याच निमित्ताने या शेवटच्या 15 दिवसांत शासन,प्रशासन,शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय आणि उस्मानाबाद मराठवाडा मुक्तीसंग्राम संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने संपुर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पुढचे 14 दिवस दररोज वेगवेगळ्या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तेव्हा या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असेही आवाहन त्यांनी केले.

4 सप्टेंबर रोजी तुळजापूर शहरात,5 तारखेला लोहयात, 6 सप्टेंबरला वाशी येथे 7 सप्टेंबरला भूम शहरात आणि इट येथे 8 सप्टेंबर, ईटकुर येथे 9 सप्टेंबर रोजी तसेच शिराढोण येथे 10 सप्टेंबर रोजी, कळंब येथे 11 सप्टेंबर, परांडा येथे 12 सप्टेंबर,ढोकी येथे 13 सप्टेंबर, तेर येथे 14 सप्टेंबर,उमरगा येथे 15 सप्टेंबर, नळदुर्ग व अंदुर येथे 16 सप्टेंबर तसेच उस्मानाबाद शहरात 17 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी आपल्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची आठवण,स्वातंत्र्य सैनिकांची व नागरीकांनी केलेल्या बलिदानाची आठवण म्हणून आपण सर्व नागरीकांनी या रक्तदान शिबीरात सक्रीय सहभाग घेऊन रक्तदान करावे. त्यांनी रक्त सांडून मराठवाडा स्वतंत्र केला.आपण रक्तदान करून जीवनदान देऊन हा संकल्प करू.असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांनी केले आहे.


 
Top