परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव  पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या “शिव-शक्ती परिक्रमा” प्रवासाच्या निमित्ताने शनिवार दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता परंडा शहरात येत आहेत. पंकजाताई मुंडे यांचे परंडा शहरात सकाळी 9.15 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात येणार आहे. स्वागतानंतर त्या माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या ‌‘संवाद' निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी शनिवार 9 सप्टेंबर रोजी स. 9.15 वा. स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष ॲड. संदीप शेळके यांनी केले आहे.


 
Top