तेर (प्रतिनिधी)-आर्ट ऑफ लिविंग परिवार तेर. यांच्या वतीने तेर येथे श्रावण मासानिमित्त रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
रूद्र पूजेसाठी बेंगलोर आश्रमातील साध्वी नित्यबोधाजी, नंदन पंडित व श्रीधर पंडित यांनी रुद्र पूजा केली. याप्रसंगी तेर मधील अनेक भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी धाराशिव जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी तसेच भरपूर पाऊस पडण्यासाठी संकल्प करण्यात आला. याप्रसंगी आर्ट ऑफ लिविंग परिवार धाराशिव चे नंदकुमार तांबडे,सचिन मोकाशी, हरीश प्रसाद सोनटक्के यांनी सत्संग केला. यावेळी तेर मधील आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक विजयसिंह फंड , साधक बालाजी भक्त नवनाथ पांचाळ, नारायण साळुंखे, बबन कोकरे, सुधाकर चव्हाण ,रमेश गायकवाड, गजेंद्र साळुंखे, राहुल नाईकवाडी ,सुनिता पांचाळ, सुरेखा फंड जयश्री माळी ,आशा माळी ,निता गायकवाड, सुचिता साळुंके, रेषमा साळुंके, जोशीला लोमटे, रोहिणी नाईकवाडी ,सत्यशीला चव्हाण यांनी संकल्पात सहभागी होऊन रूद्रपुजा केली. यावेळी तेरसह पंचक्रोशीतील साधकांनी रुद्र पूजेत सहभाग नोंदवला.