परंडा (प्रतिनिधी) - येथील राजापूरा गल्लीतील बालवीर गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरात 68 गणेश भक्तांने आपले रक्तदान केले.                                        

शहरातील महाराजा समजला जाणारा बालवीर गणेश मंडळाच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 रोजी सकाळी 11 वाजता येथील श्री भवानी शंकर मंदिरात  सोलापूर येथील मलिकार्जुन ब्लड बँक सोलापूर  यांच्या वतीने  रक्तदान घेण्यात आले होते.या रक्तदान शिबीराचे उद्घाटन  परंडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी परंडा नगरीचे माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, तुकाराम साळुंके, सुरेशसिंह सद्दीवाल,  महाराष्ट्र चॅम्पीयन पै.संजय (अप्पा) काशीद ,मराठा सेवा संघचे माजी तालुका अध्यक्ष शशीकांत बापू जाधव, माजी नगर सेवक गणेश राशनकर , कल्याणसागर बँकेचे व्यवस्थापक मनोजसिंह ठाकूर, ॲड पृथ्वीराजसिंह सद्दीवाल, श्री भवानी शंकर मंदिराचे विश्वस्त पुजारी किशोर महाराज बैरागी, प्रविण मिश्रा, प्रवेश मिश्रा, किरण ठाकूर, संकेतसिंह ठाकूर धीरजसिंह ठाकूर, आदर्श सिंह ठाकूर, बंटी ठाकूर, किरण पांडे, अमर ठाकूर, सागर ठाकूर मदन दीक्षित आदींची उपस्थिती होती. या रक्तदान शिबीरात 68 भक्तांनी रक्तदान केले मंडळाच्या वतीने रक्तदान करणारे भाविकांना प्रमाणपत्र व जांबुळ वृक्ष रोपवाटीका भेट म्हणुन देण्यात आले .      

रक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालवीर गणेश मंडळाचे अध्यक्ष पावन मिश्रा ,उपाध्यक्ष संकेत शुक्ला  खजिनदार सुरजसिंह ठाकूर, सहखजिनदार आयुषसिंह सद्दीवाल, सचिव तुषार पांडे,सहसचिव विश्वजीत ठाकूर,विक्रम मिश्रा, पारस मिश्रा अकाश मदने, विशाल मदने,अभिषेक मिश्रा,अक्षय मिश्रा, अजय पांडे, राहुल देशमाने, हारी दीक्षित, रक्षित सद्दीवाल, रोहन सुरवसे आदी मंडळाच्या पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी केला.


 
Top